पुणे  केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘मॉक ड्रिल’

पुणे  केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘मॉक ड्रिल’
  • MG News
  • मे 7 2025

Share on  

पुणे  केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ 

 केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्यादृष्टीने  विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज दुपारी ४:०० वाजता ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आलं. मॉक ड्रिलची गांर्भियता लक्षात घेता, सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम केले. या ठिकाणी आपण पुणे विधान भवन या ठिकाणची काही प्रात्यक्षिके पाहिली. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून, मॉक ड्रील घेण्यात आले. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली गेली. केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यांचा या मॉक ड्रीलमध्ये सहभागी होता.

 जितेंद्र डुडी (जिल्हाधिकारी)

संबंधित बातम्या