पुणे : अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त 'दौड' कार्यक्रमाचे आयोजन
अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात राज्यभर साजरी होत आहे. भाजपच्या वतीने त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्त दहा दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रविवारी महिला मोर्चाच्या माध्यमातून मी अहिल्याबाई होळकर दौड आयोजित करण्यात आली होती. महिला मोर्चाच्या मृणाल पेंडसे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजपाच्या सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत महिलांच्या सन्मानार्थ ही दौड काढण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह लहान मुलींनी अहिल्याबाई होळकरांची वेशभूषा केली होती. तसेच हातात मशाल घेत ही दौड काढण्यात आली.