पुणे : मुसळधार पावसाची हजेरी

  पुणे : मुसळधार पावसाची हजेरी
  • MG News
  • मे 21 2025

Share on  

 पुणे : मुसळधार पावसाची हजेरी

       राज्यात मागच्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. त्यातच हवामान विभागाने आठवड्याभराचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पुण्यातही दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली. शहरातील शिवाजी नगर, औंध, बाणेर, कात्रज, कोंढवा, जेएम रोड, एफसी रोड तसेच पिंपरी चिंचवडमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते जलमय झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात पावसाची जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन झालेलं आहे. मंगळवारी सकाळपासूनच अंशतः ढगाळ वातावरण होतं.

संबंधित बातम्या