पंजाब: टोल प्लाझावर पंजाब सरकारच्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ; कर्मचाऱ्यांवर हात उचलल्याचा आरोप

पंजाब: टोल प्लाझावर पंजाब सरकारच्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ; कर्मचाऱ्यांवर हात उचलल्याचा आरोप
  • MG News
  • नोव्हेंबर 8 2025

Share on  

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंजाब सरकारचा गणवेशधारी कर्मचारी ऑन-ड्युटी असताना टोल प्लाझा कर्मचाऱ्यांवर हात उचलताना दिसत आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि प्लाझा स्टाफमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांनी नॅशनल हायवेवरील टोल प्लाझावर जबरदस्तीने टोल न देता मार्ग मोकळा केला. यामुळे सरकारी महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि टोल प्रशासनाने प्रश्न उपस्थित केला आहे की;  “पंजाब सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना इतकी मोकळीक का देत आहे की ते कायद्यापेक्षा वरचढ समजतात?”

यासंदर्भात नागरिकांनी पंजाब सरकारकडे, नवांशहर जिल्हा प्रशासनाकडे आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून संबंधित कर्मचाऱ्यावर सस्पेंशन आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याचे समजते.

संबंधित बातम्या