रायगड : पेझारीत शेतकरी कामगार पक्षाची भव्य रॅली

रायगड : पेझारीत शेतकरी कामगार पक्षाची भव्य रॅली
  • MG News
  • मे 19 2025

Share on  

रायगड : पेझारीत शेतकरी कामगार पक्षाची भव्य रॅली

            भारतीय शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्याचा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन अलिबागच्या पेझारीत आज करण्यात आले होते.  या मेळाव्याप्रसंगी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो या घोषणांनी अक्षरश परिसर दणाणून निघाला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी आमदार बाळाराम पाटील,  मानसी म्हात्रे, चित्रलेखा पाटील, सुरेश खैरे, अतुल म्हात्रे आदींसह प्रमुख पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या