रायगड : मोदीवाद संपवून गांधीवाद आणणार, काँग्रेसचा श्रीवर्धनच्या आढावा बैठकीत एल्गार
एकेकाळी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन रायगड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस ताकतीने सरसावलीय. आज श्रीवर्धन मध्ये काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा रायगड निरीक्षक राजेश शर्मा यांनी मोदींवर हल्लाबोल करीत आम्हाला मोदी वाद संपवून गांधीवाद जिवंत करायचा आहे, असा इशारा सरकारला दिला. येत्या काळात आम्हाला घरोघरी जाऊन काँग्रेसची विचारधारा घट्ट रुजवायची आहे. बॅरिस्टर अंतुले यांचा बालेकिल्ला पुन्हा पुनर्जीवित करून आगामी निवडणुकीत आम्ही काँग्रेसचीच सत्ता आणण्याचा निर्धार शर्मा यांनी केला. आमची लढाई मोदी, अंबानी आणि अदानी यांच्याविरोधात ही असल्याचा घणाघात यावेळी त्यांनी केला. पहलगाम हल्ल्याबाबत युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असे शर्मा म्हणाले.
राजेश शर्मा, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस काँग्रेस, रायगड जिल्हा निरीक्षक