राज्यात सर्वत्र पाऊस : पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे मोठे नुकसान

राज्यात सर्वत्र पाऊस : पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे मोठे नुकसान
  • MG News
  • मे 26 2025

Share on  

मे  महिन्यातच आलेल्या मान्सुममुळे महाराष्ट्राच्या पश्चिम आणि तळ कोकण या भागात हा:हाकार उडाला आहे. सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि लगतच्या पुणे जिल्ह्याचा भागात मुसळधार पावसाने अनेक भागांचा संपर्क तूटला आहे‌. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयार केलेल्या शेतातह चिखल झाल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे‌ .चिंचोली मालटण रस्ता खचला आहे‌.पाटणमध्ये कोयना नदीवरील बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे‌. इंदापुरात वीज भट्टी वाहुन गेली आहे. तसेच पशूधनाचे मोठे नुकसान झाले आहे.बारामतीत नागरीकांना  निवारा शिबिराचा आश्रय घ्यावा लागला आहे.
तळकोकणातील चिपळूण येथील परशुराम घाटातील संरक्षण भिंतीचे काम  पावसामुळे थांबवावे लागले आहे. रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांना अती वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे

संबंधित बातम्या