अमरावती शहरातील राजुरा येथील तेजस विहार परिसरात मुसळधार पावसामुळे सगळीकडे चिखल साचला आहे. त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. नागरिकांची वाहने रस्त्यावर स्लिप होऊन अपघात देखील होत आहे. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. परिसरात बिबट्यांचा सुद्धा वावर असल्यामुळे नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राजुरा येथील तेजस विहार परिसरातील महिला ही समस्या घेऊन प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके, छोटू महाराज वसू, जितू दुधाने यांच्यासह प्रहार चे कार्यकर्ते जिल्हा परिषद वर धडकले होते. संबंधित समस्या तत्काळ निकाली काढण्यासाठी पाणी व चिखल साचलेल्या मार्गावर मुरूम टाकावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.