नांदेड जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू झालीये. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस झाला नाही. आज जिल्ह्यात जवळपास सर्वदूर पावसाला सुरुवात झालीये. तब्बल एका महिन्यानंतर नांदेड मध्ये पावसाने हजेरी लावलीये.
जून मध्ये काही प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र, जुलै महिना संपत आला तरी पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. तर नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, आता नांदेडमधे पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, या पावसाने शेती पिकांना जीवनदान मिळणार आहे. त्यासोबतच वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिक उकाड्यापासून मुक्त झाले आहेत.