राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पराभवाच्या मानसिकतेत – चंद्रशेखर बावनकुळे

 राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पराभवाच्या मानसिकतेत – चंद्रशेखर बावनकुळे
  • MG News
  • ऑक्टोबर 14 2025

Share on  

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे निवडणुकीआधीच पराभवाच्या मानसिकतेत गेले आहेत,” अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात केली. निवडणूक आयोगाच्या भेटीला जाणे हा त्यांचा अधिकार असला तरी, “आम्हाला खात्री आहे की महायुती ५१ टक्के मतांसह राज्यात विजयी ठरेल,” असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोतवाल आंदोलनावर उपाय लवकरच:
राज्यात ३६ दिवसांपासून सुरु असलेल्या कोतवालांच्या आंदोलनावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “कोतवालांची चतुर्थश्रेणी देण्याची मागणी आहे, पण राज्यात चतुर्थश्रेणी पदे बंद झाली आहेत. मात्र काही अन्य मागण्या मान्य करता येऊ शकतात. त्यामुळे १६ तारखेला बैठक बोलावली असून, त्या बैठकीत कोतवालांचा प्रश्न मार्गी लावू,” असे ते म्हणाले.

रेती धोरणाबाबत स्पष्ट भूमिका:
रेती धोरणावर दाखल झालेल्या याचिकेबद्दल विचारले असता बावनकुळे म्हणाले, “रेती धोरण हे लोकांना रेती उपलब्ध व्हावी म्हणून केलं आहे. तीन महिने रेती बंद होती. आता ५०० पेक्षा जास्त रेती घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी जे मांडले त्याचे उत्तर आम्ही कोर्टात देऊ.”

काँग्रेसच्या आरोपांवर प्रत्युत्तर:
सायन्स सेंटरच्या नावाबाबत काँग्रेसच्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिलं. “नेहरू सेंटरऐवजी लायन्स सेंटर हे नाव दिलं, कारण लायन्स सेंटर आधुनिक आणि विकसित भारताचे प्रतीक आहे. नावात अडकण्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे,” असं बावनकुळे म्हणाले.

जिल्हा परिषद कायद्यात सुधारणा सुचवली:
बावनकुळे यांनी जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. “महानगरपालिकेत जशा स्वीकृत सदस्यांची तरतूद आहे, तशीच जिल्हा परिषदेत तीन आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य नेमावेत,” अशी सूचना त्यांनी केली.
“मुख्यमंत्री ही मागणी मान्य करतील, असा मला विश्वास आहे,” असे बावनकुळे यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या