आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूकीचा विचार करता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नाशिक दौरा राज ठाकरेंनी ३तासात आटोपता घेत
मुंबईसाठी प्रस्थान केले. राज यांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत काहीही चर्चा झाली नाही फक्त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी पक्ष बांधणीबाबत चर्चा झाली.
राज यांच्या पुर्व नियोजीत दौऱ्यात ते नाशिकहून पुण्यात जाणार होते मात्र मुंबईला परतल्याने राज यांच्या मनात काय चाललयं याची चर्चा राजकीय आखाड्यात सुरु आहे