रत्नागिरी : बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा

रत्नागिरी : बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा
  • MG News
  • मे 7 2025

Share on  

 रत्नागिरी : बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा 

 बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा हस्तक्षेप असलेला बोधगया टेंपल ॲक्ट १९४९ रद्द करावा, या मागणीसाठी रत्नागिरीत बुधवारी आज हजारो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. बुद्धगया आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", "बुद्धगया आमच्या तांब्यात द्या" अशा जोरदार घोषणा देत रत्नागिरीच्या रस्त्यांवर जनसमुदायाने आपल्या भावना व्यक्त केल्या. बौद्ध भिक्खूंनी देशभरात उभारलेल्या लढ्याला पाठींबा दिला गेला. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून बौद्ध धर्मीयांच्या भावना व न्याय्य मागण्या मांडल्या. यावेळी जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता

अनंत सावंत

संबंधित बातम्या