रत्नागिरी : मुख्य बस स्थानक इमारतीचा लोकार्पण
रत्नागिरी मुख्य बस स्थानक इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत,रोजगार हमी,फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रत्नागिरीतील बस स्थानक हे इतर बस स्थानकांसाठी रोल मॉडेल असेल अशी देखील भावना व्यक्त केली. ही भव्य इमारत ज्या निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरने केले त्यांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विशेष अभिनंदन केले. ही वास्तू सुसज्ज व स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी देखील आपापल्या पद्धतीने प्रयत्न करावेत असे देखील आवाहन यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती.