रत्नागिरी : दहावी परीक्षेत विभागीय मंडळात यंदाही कोकण सर्वप्रथम

 रत्नागिरी :  दहावी परीक्षेत विभागीय मंडळात यंदाही  कोकण सर्वप्रथम
  • MG News
  • मे 13 2025

Share on  

 रत्नागिरी :  दहावी परीक्षेत विभागीय मंडळात यंदाही  कोकण सर्वप्रथम

          कोकण विभागीय मंडळाने सन २०१२ पासून म्हणजे कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून राज्यात सर्व विभागीय मंडळात सर्वप्रथम स्थानी येण्याचा बहुमान यावर्षीही कायम ठेवला आहे. मार्च २०२४ चा निकाल ९९.०१% इतका होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल १८.८२% इतका आहे. तर मार्च २०२४ च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल ०.१९% टक्केने कमी आहे.

या परीक्षेस या विभागीय मंडळामधून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील ६४९ माध्यमिक शाळेमधून ११४ परीक्षा केन्द्रावर एकूण २६९०१ नियमित विद्यार्थी नोंदणी झाले होते. त्यापैकी २६८६१ इतके विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी २६५४६ विद्याथों उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.८२% इतकी आहे.रत्नागिरी जिल्हयासाठी ४१९ माध्यमिक शाळेमधून ७३ परीक्षा केन्द्रावर एकूण १८०४६ नियमित विद्यार्थी नोंदणी झाले होते. त्यापैकी १८०११ इतके विद्यार्थी प्रविष्ट झाले, त्यापैकी १७७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.५८% इतकी आहे.
 

संबंधित बातम्या