रत्नागिरी : उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद
लोटे एमआयडीसी स्फोट
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करून एक समिती नेमली गेली आहे
त्यासंदर्भात आठ ते पंधरा दिवसांमध्ये अहवाल मिळेल, कशामुळे स्फोट झाला हे चित्र आपल्यासमोर येईल
केमिकलमुळे हा स्फोट झाल्याचे प्राथमिक माहिती मला दिली गेली आहे
खेड कार अपघात
यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी मला माहिती दिली, मी देखील संपर्कात आहे
मी त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोललो आहे
यात संदर्भात काय त्रुटी आहेत या बघण्याच्या सूचना महामार्गाच्या मुख्य अभियंतांना दिल्या आहेत
आत्ताच प्राथमिक यावर बोलणं योग्य नाही
निष्पन्न झाल्यावर बोलणं योग्य होईल
चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
CNG गॅस तुटवडा
पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत
सीएनजी तुटवडा संदर्भात खात्री करून आज घेणार आहे
अमित ठाकरे
तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे
भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत
भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवंदना देण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काही नाही
जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही हा तिरंगा रॅली म्हणून कार्यक्रम होत आहे
तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे
सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा एक विधायक रॅली आहे
उद्धव ठाकरे गट
ठाकरे गटाने जबाबदारी दिलेले किती लोक त्यांच्यासोबत निवडणुकीपर्यंत राहतील
मी पाहतो आहे, कितीही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली तरी मी दाव्याने सांगतो मुंबई महानगरपालिकेपासून ते थेट रत्नागिरी नगरपरिषदेपर्यंत ते थेट स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीची सत्ता येईल
सुनील तटकरे नक्कल प्रकरण
भरत गोगावले यांचा रुमाल खांद्यावर नसतोच
खांद्यावर रुमाल टाकणारा नेता कोण आहे हे मला शोधावं लागेल
अजून कितीही निवडणुका झाल्या तरी भरत गोगावले तिथून निवडून येणार ही कळ्या दगडावरची रेख
आमचे भरत गोगावले आत्मविश्वासानं टॉवेल काखेत ठेवतात
भरत गोगावले यांची नक्कल केली असे मी मानत नाही. कारण ते कधीच खांद्यावरती टॉवेल टाकत नाहीत
रायगड मधील काल शक्तिप्रदर्शन हे महायुतीचं होतं
अजित पवारांना धन्यवाद दिले पाहिजेत कारण त्यांनी भरत गोगवलेंची ताकद वाढवली
भरत गोगावले यांचे मताधिक्य आता 50 हजाराच्या पुढे गेलो
हे महाविकास आघाडीसाठी आहे कितीही लोक एकत्र आली तरी भरत गोगावले निवडून येणार