रत्नागिरी : मंत्री भरत गोगावले आणि योगेश कदम यांच्याकडून शिवसृष्टीचे काम बघून समाधान व्यक्त करण्यात आले
राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री, गृहराज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी रत्नागिरीतील शिवसृष्टीला भेट दिली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. शिवसृष्टीचे भव्य दिव्य स्वरूप पाहून मंत्री भरत गोगावले भारावून गेले. पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त करून दाखवली. अरबी समुद्राकिनाऱ्या नजीक असलेल्या एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे यावेळी त्यांनी दर्शन घेतले व आढावा घेतला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील शिवसृष्टीचे कामकाज पाहून समाधान व्यक्त करून मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या.