रत्नागिरी : लांजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी
हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. सकाळपासूनच लांजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची रिपरिप चालू होती. दुपारनंतर मात्र अवकाळी पावसाच्या सरींचा वेग वाढू लागला. तालुक्यातील वेरवली, विवली, खेरवसे, केळंबे, स्वामीवड या भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरींच्या शिडकाव्यामुळे भात शेतीच्या मळ्या पाण्याने तुडुंब भरून गेल्या गेल्याचे चित्र लांजा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे. मान्सूनपूर्व शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी राजाला मात्र या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. विजेच्या कडकडाटामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितता व सतर्क राहण्याचे देखील आवाहन केले आहे. परंतु, अंतिम टप्प्यातील आंबा पीक यामुळे धोक्यात आले आहे.