रावेर_लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पुरग्रस्त गावांना भेट...

रावेर_लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पुरग्रस्त गावांना भेट...
  • MG News
  • सप्टेंबर 18 2025

Share on  

मागील २ दिवसापासून होत असलेल्या संततधार पाऊस व वादळी वाऱ्यांमुळेमुळे रावेर_लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील अनेक गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून उभ्या पिकांचे मोठे मोठे नुकसान झाले आहे. आज सदर काकोडा, बोरखेडा, राजुरा, जोंधणखेडा, हलखेडा, धुळे, चिंचखेडा खुर्द व कुऱ्हा इ. पुरग्रस्त गावांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. 

यावेळी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. बहुतांश भागात अजूनही पाणी साचलेले असून, अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशुधनाची हानी, धान्य व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, दुकाने व ग्रामीण रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच काकोडा येथील किरण सवळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला असता त्यांच्या परिवाराची भेट घेतली. 

शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध होईल तसेच नुकसानाचे पंचनामे तातडीनं पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनास आवश्यक निर्देश दिले आहेत. याप्रसंगी यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी बांधव व तालुक्यातील संबंधित अधिकारी सोबत उपस्थित होते


एमजी न्यूज ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर

संबंधित बातम्या