महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी एक्स पोस्टद्वारे २०२४ - २५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपये एवढी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती दिली. राज्यात २०२३ - २४ या आर्थिक वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा २०२४ - २५ या आर्थिक वर्षात ३२ टक्के जास्त परकीय गुंतवणूक आली

.भारतात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. देशात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात एकूण चार लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे.महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत नवा विक्रम करणारे ठरले. हा विक्रम महाराष्ट्राने नऊ महिन्यांतच मोडला.

संबंधित बातम्या