अतिक्रमणामध्ये घरे गेलेल्या बेघरांच्या मागण्या संदर्भात; आझाद समाज पार्टीच्या वतीने आमरण उपोषण

अतिक्रमणामध्ये घरे गेलेल्या बेघरांच्या मागण्या संदर्भात; आझाद समाज पार्टीच्या वतीने आमरण उपोषण
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

शहरातील अतिक्रमणात नागरिकांचे अस्मिता असलेले धार्मिक स्थळे, बौद्ध विहार प्रवेशद्वार यांना महानगरपालिकेतर्फे नियमानुसार अंतर्गत मंजूर करून न्याय द्यावा. छत्रपती संभाजीनगर मध्ये महापालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत जी मोहिम चालू करण्यात आली आहे. त्यामध्ये गोरगरीब कष्टकरी नागरिकांची घरे आहेत. व त्या वसाहती झोपडपट्टी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या राजपात्रावर स्लम म्हणून घोषित आहे. व या वसाहती गेल्या ५० ते ६० वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास असून, येथील गोरगरीब नागरिक रोजंदारी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. ते नागरिक आपल्या महानगरपालिकेने लावून दिलेल्या टॅक्स, पाणीपट्टी हे देखील नियमित भरतात. अशांची घरे तोडल्यानंतर येथील नागरिकांचे आयुष्यात कधी स्वतःचे पक्के घर होणार नाहीत. त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ येईल, असे हातावर काम करून आपला उदारनिर्वाह भागवणारे लोक या ठिकाणी राहतात. त्यांचे पहिले पुनर्वसन करा. पंतप्रधान घरकुल आवास योजनेत त्यांना प्राधान्याने प्राधान्य द्यावे. 

संबंधित बातम्या