अनधिकृत भोंगे उतरवण्यात धार्मिक स्थळ पदाधिकाऱ्यांचे लाभले सहकार्य

अनधिकृत भोंगे उतरवण्यात धार्मिक स्थळ पदाधिकाऱ्यांचे लाभले सहकार्य
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

 ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियम २००० आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने, पोलिस स्टेशन आमगाव हद्दीतील मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, दरगाह आदी परिसरातील एकूण ६५ धार्मिक स्थळांवरील भोंगे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हटविण्यात आले. ही मोहीम आमगाव पोलिसांनी राबविली.

ध्वनिप्रदूषणाच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सार्वजनिक व धार्मिक स्थळावरील भोंगे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, परस्पर सहमतीने हा उपक्रम राबविला आणि याला सहकार्य सुद्धा पदाधिकाऱ्यांनी केले. ६५ जागांवरचे भोंगे हे उतरवण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. सामंजस्याने पोलीस विभागाने हे कार्य केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या