पंचवटीतील इंद्रकुंड येथील सुनील नथु अहिरे (वय ५५) हे पत्नी, दोन मुलांसमवेत वास्तव्यास होते. उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवत होता. शुक्रवार (दि.२६) रोजी सुनील रिक्षा चालवत बळी मंदिरकडून मेरी - रासबिहारी लिंक रोड मार्गे आर टी ओ कॉर्नरकडे चालले होते. राजमाता मंगल कार्यालयासमोर खड्डा वाचविताना रिक्षाचा अपघात झाला. यात रिक्षा पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाले. तेथील नागरिकांनी धाव घेत जखमीस तातडीने उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
हा पाचवा अपघात असून ह्या ठिकाणी एकाच महिन्यात तीन जण मृत्युमुखी पडले आहे. मेरी रासबिहारी लिंक रोड जागोजागी व्यवसायिकांनी फूटपाथवर वाढीव बांधकाम केल्यामुळे पाणी साचून खड्डे तयार होतात व रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताची मालिका सुरू झाली त्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल.
रवि सुमन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता