शेतकऱ्यांच्या युद्ध मागण्यासाठी नांदेड - हिंगोली महामार्गावर रास्ता रोको

शेतकऱ्यांच्या युद्ध मागण्यासाठी नांदेड -  हिंगोली महामार्गावर रास्ता रोको
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

नांदेडमध्ये आज शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांनी नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर महादेव पिंपळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे. कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीचे काम या महत्त्वाच्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

तब्बल दोन तासांपासून महामार्ग ठप्प आहे. आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या