विस्थापित गाळेधारक कुटुंबासमवेत रस्ता रोको,पुणे-इंदोर व नाशिक-संभाजीनगर महामार्ग रोखला

विस्थापित गाळेधारक कुटुंबासमवेत रस्ता रोको,पुणे-इंदोर व नाशिक-संभाजीनगर महामार्ग रोखला
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

 येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा , ई लिलाव पद्धत रद्द करावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी  शिवसेनेने विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह पुणे- इंदोर महामार्ग रोखत येवल्यातील विंचूर चौफुली येथे भर पावसात रस्ता रोको आंदोलन केले.

येवला नगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. भर पावसात जवळपास तीन तास या आंदोलकांनी रस्ता रोको केला. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे  हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
 

संबंधित बातम्या