रॉबर्ट कीयोसाकी यांनी सांगितला संकटातही श्रीमंत होण्याचा फॉर्मुला

रॉबर्ट कीयोसाकी यांनी सांगितला संकटातही श्रीमंत होण्याचा फॉर्मुला
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

सोनं, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी भरघोस नफा कमावला, तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तोटा झाला.

रॉबर्ट कियोसाकी यांनी सल्ला दिला की बाजार क्रॅश झाले किंवा दर घसरले, तर खरेदीची हीच सर्वोत्तम संधी असते. योग्य वेळ आणि संयमाने केलेली गुंतवणूक दीर्घकाळात प्रचंड नफा देऊ शकते.

भारतीय आणि जागतिक शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत मोठे चढ-उतार सुरू आहेत. गुंतवणूकदारांना शेअर बाजारात तोटा सहन करावा लागत असला तरी सोनं, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणारे मात्र भरघोस नफा कमावत आहेत. 'रिच डेंड पुअर डॅड'  या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे.

इतिहास सांगतो की, जागतिक संकट, आर्थिक घसरण किंवा अनिश्चितता वाढली की सोनं-चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये मागणी झपाट्याने वाढते. सध्या सोनं १ लाख रुपये प्रति १० ग्रॅम या ऐतिहासिक पातळीवर पोहोचलं आहे, तर चांदी १,१५,१३६ रुपये प्रति किलो या नव्या शिखरावर आहे. बिटकॉइनचे दरही १,२३,१६६ डॉलरवर पोहोचले आहेत. शेअर बाजाराने निराशा केली असली तरी या तीनही मालमत्तांनी लोकांना मालामाल केलं आहे.

कियोसाकी यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे, "बाजारातील फुगा फुटणार आहे आणि त्याचा परिणाम सोनं, चांदी आणि बिटकॉइनवर होऊ शकतो. पण जर दर कमी झाले, तर मी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू करणार आहे त्यांच्या मते, दर कमी होणं ही भीती नसून गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे.

शेअर बाजार क्रॅश झाला किंवा मंदीच्या काळात सोनं आणि बिटकॉइनचे दर घसरले तरी त्यानंतर त्यात जोरदार वाढ झाली आहे. २००८च्या आर्थिक मंदीत सोन्याचे दर १०% नी घसरले होते, पण नंतर रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली. २०१८ मध्ये बिटकॉइन ५०% नी कोसळला होता, पण काही वर्षांत त्याचे दर १.२३ लाख डॉलरवर पोहचले. कियोसाकींच्या मते, अशा घसरणीच्या काळात संयम बाळगून योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात प्रचंड नफा मिळू शकतो.

संबंधित बातम्या