आदिवासी बहुल ग्रामीण भागात असलेले चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी, तसेच सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध कराव्यात, भिवंडी ग्रामीण ची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रामीण भागाकरिता स्वतंत्र आरोग्य यंत्रणा उभी करा, रुग्णवाहिका सुविधांमध्ये वाढ करा, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा दर्जा सुधारावा, इत्यादी अनेक मागण्यांकरिता प्रांत कार्यालय भिवंडी येथे आरपीआय युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट अजिंक्य गायकवाड यांच्या नेतृत्वात शासनाचे लक्ष वेधण्याकरिता 'लक्षवेधी धरणे आंदोलनरआयोजित करण्यात आले असून यामध्ये ग्रामीण भागातून सर्वपक्षीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.