सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बरखास्त करा, संभाजी भिडे यांची मागणी

सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बरखास्त करा, संभाजी भिडे यांची मागणी
  • MG News
  • मे 23 2025

Share on  

शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे, त्यामुळे 6 जून रोजी साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरुपी बरखास्त करायला पाहिजे, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली आहे. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार (6 जून) न करता, तिथीनुसार करावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. या मागणीसोबतच, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू नये, असेही ते म्हणाले. छत्रपती संभाजीराजे यांनी वाघ्याच्या समाधीला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर भिडे यांच्या मागणीमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणेच पार पडले पाहिजेत. 6 जून रोजी साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरुपी बंद व्हावा, असं संभाजी भिडे म्हणाले. हुंडा देण्याची प्रथाही पूर्णपणे बंद केली पाहिजे, असेही संभाजी भिडे म्हणाले.

संबंधित बातम्या