संभाजीनगर- गरजवंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी बळीराजा संघटनेच्या वतीने धरणे निदर्शने
संभाजीनगर - राज्यात दर वर्षी पाऊस कमी अधिक प्रमाणात पडतो राज्यातील शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या पिकांचे नुकसाण होऊन नेतात माल पिकत नाही, तसेच शासन शेतकऱ्यांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही, त्यामुळे शेतकरी बँकामार्फत व इतर खाजगी सावकरांमार्फत कर्ज शेती करिता घेतात. परंतु शेतात काही पिकलच नाही, तर तो बँकांचे व खाजगी सावकारांचे कर्जाची परत फेड करण्यास असमर्थ होतो. व त्यामुळे शेतकऱ्याला आत्माहत्या करण्याचे पाऊल उचलावे लागते. महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी शेतीवर अवलंबुन आहेत. अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत त्वरीत संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, जर शासनामार्फत कर्ज माफीचा निर्णय नाही घेतला, तर अखिल भारतीय बळीराजा संघटने मार्फत राज्य भरता तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. .
(बळीराजा शेतकरी संघटना अध्यक्ष)