संभाजीनगर- टोकि शेतशिवार वस्तीवरील दरोडा प्रकरण; काही तासातच छडा, श्वान पथकाची उत्कृष्ट कामगिरी
संभाजीनगर - गंगापूर तालुक्यातील टोकि शेतशिवार वस्तीवर राहणाऱ्या भीमराव शेजवळ आणि कारभारी शेजवळ या शेतकऱ्यांच्या घरावर आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत धुमाकूळ घालून शेतकरी कुटुंबीयांना बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह 5 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले होते. सदर घटनेचा एमआयडीसी वाळूज पोलीस छत्रपती संभाजी नगर गुन्हे शाखा तपास करीत असताना श्वान पथकाच्या मदतीने दरोडेखोरांच्या मुस्क्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले. डॉग एडमिन टिपू याने घटनास्थळापासून तब्बल सात ते आठ किलोमीटर अंतर कापून आरोपींना सिंधी सिरसगाव येथे गाठून आरोपींला शोधल्याने पोलीस प्रशासनाने दरोडा टाकणाऱ्या सातही आरोपींना अटक केली आहे. सातही आरोपी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.