आपल्या परिवारातील व्यक्तीमुळे मंत्री अडचणीत येण्याची परंपरा सुरूच आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाठ आपल्या मुलामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय शिरसाठ यांच्या मुलगा सिद्धार्थ यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील एका महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, हुंडा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा गंभीर असल्याने संजय शिरसाठ यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
ही महिला आणि सिद्धार्थ यांची सोशल मिडीयावर ओळख झाली त्यानंतर मुंबई येथील एका फ्लॅटवर दोघे भेटले. दोघांनी शरीर संबंध ठेवले. त्यानंतर सिद्धार्थ यांनी लग्नासाठी आग्रह धरला लग्न केले नाही तर आत्महत्या करेल असे सांगत भावनिक दबाव निर्माण केला. जानेवारी २०२२ मध्ये लग्न देखील केले. मात्र सिद्धार्थ यांनी संभाजीनगर येथून महिलेस घेऊन जाण्यास नकार दिला, आणि मुंबईतील फ्लॅटवरच राहण्यास सांगितले. अन्य महिलांशी असणारी ओळख उघड झाल्यावर मी आत्महत्या करेल. कुटूंबाचा नाश करेल अशी सातत्याने धमकी दिली. असे या महिलेने अँडव्हकेट ठोबरे यांच्यामार्फत पाठवलेल्या नोटिसीमध्ये सांगण्यात आले आहे .