पंढरपूर येथील आषाढीचा सोहळा आटोपून संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतली आहे. तब्बल बाराशे किलोमीटरचा पायी प्रवास करत दोन महिन्यांच्या कालावधी नंतर आज गजानन महाराजांची पालखी शेगावात पोहचली आहे.
या पालखी सोबत खामगाव येथून लाखो भाविक शेगावात दाखल झाले असून, त्यामुळे शेगावात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
पालखी शेगावात पोहचताच पालखीचे संस्थानकडून तसेच संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने पालखीचे स्वागत केले.