दिनांक १८/१०/२०२५ रोजी मयूर भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपुर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळली की, निजामपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही तरुण हे संशयितरित्या मालविरुद्ध गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत. रात्री गस्त घालणारे पोहेकॉ प्रदीपकुमार आखाडे, पोकॉ पवार, चापोकॉ माळी यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने छडवेल कोर्डे परीसरात सक्त पेट्रोलींग करुन संशयितांचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान या पथकाने रात्री १२:३० वाजेच्या सुमारास छडवेल गाव शिवारात दहिवेल-नंदुरबार रस्त्यावर;
1. नगरसिंग ऊर्फ नगसिंग ओंकारसिंग शिकलीकर, 2. पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर, 3) गुरुपाल कप्तान सिकलीकर सर्व रा. एकता नगर, नळवा रोड, नंदुरबार ता.जि. नंदुरबार असे संशयीतरित्या मिळुन आल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात घरफोडी करण्याच्या उपयोगी असणारे साधन दोन स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी टामी, एक अॅडजेस्टेबल लोखंडी पाने, व एक मोसा असे साधन मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन निजामपुर पोलीस स्टेशन येथे आणुन अधिकची चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येत आहे.
निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी मयुर एस.भामरे यांनी निजामपुर/जैताणे तसेच माळमाथा परीसरातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, दिपावली सण असुन त्याअनुषंगाने अशा प्रकारचे कोणतेही संशयीत किंवा अनोळखी व्यक्ती दिसुन आल्यास घाबरून न जाता तात्काळ निजामपुर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, मा. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी श्री. मयुर एस.भामरे, सपोनि प्रियदर्शनी थोरात, पोसई मधुकर सोमासे, पोउपनि वाय. आर. भामरे, पोहेकॉ प्रदीपकुमार आखाडे, पोहेकों नारायण माळचे, पोहेकॉ रतन मोरे, पोकों अर्जुन पवार, पोकॉ गौतम अहिरे, पोकों परमेश्वर चव्हाण, पोकों श्रीराम पदमर, सुनिल अहिरे, पोकों टिलु पावरा, चापोकों मोहन माळी यांचे पथकाने केली आहे.