रत्नागिरीत समुद्राला मोठे उधाण; किनारपट्टी भागात उंच लाटांचा तडाखा

रत्नागिरीत समुद्राला मोठे उधाण; किनारपट्टी भागात उंच लाटांचा तडाखा
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

रत्नागिरीत समुद्राला मोठे उधाण आले आहे. सलग चौथ्या दिवशी उधाणाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसला असून किनारपट्टी भागात आज पुन्हा एकदा साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळत आहे. रत्नागिरी गणपतीपुळे, मालगुंड, गुहागर, दापोली, राजापूर या किनारपट्टी भागात अजस्त्र लाटा उसळत आहेत. 

 पंधरामाड आणि आलावा समुद्र किनारपट्टी भागात लाटांचं तांडव पाहायला मिळत आहे. धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून लाटा पलीकडे मानवी वास्तीपर्यंत पोहचत असून या लाटा समुद्रात ५.३० मीटर उंची पर्यंत उसळत आहेत. यामुळे किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या