अमरावती- सुरक्षारक्षकांचे कामगार दिनीही आंदोलन सुरूच, न्यायासाठी भर उन्हात धडपड.
सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी उपायुक्त कामगार विभाग समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शहराचे तापमान हे ४३ डिग्री सेल्सिअस वर पोहचले असताना या सुरक्षा रक्षक उपोषणावर उपोषणावर बसले आहेत. आज कामगार दीन असूनही अधिकार हक्कासाठी कामगारांना लढा द्यावा लागत आहे. ही शोकांतिका आहे.
स्वप्नील चिंचे