गंजमाळमध्ये जाळपोळीची मालिका सुरूच, तीन महिन्यात पाचवी घटना

गंजमाळमध्ये जाळपोळीची मालिका सुरूच, तीन महिन्यात पाचवी घटना
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

गंजमाळ परिसरात जुन्या वादातून एका संशयिताने दोन दुचाकींना आग लावून नुकसान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू बेग असे संशयिताचे नाव आहे.
पिरबाबा दर्गा परिसर गंजमाळ येथील रहिवासी अन्सार शेख यांचा मुलगा आणि संशयित सोनू बेग यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. 
वादाचा राग मनात धरून मध्यरात्री संशयित बेग याने तक्रारदार यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर (एमएच १५ बीक्यू १७६२), (एमएच १५ एचएफ ३७५३) ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली.

आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. दरम्यान संशयिताने हातातील पेटलेली बाटली तक्रारदार यांच्या घराकडे फेकून घराला आग लावण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने घराचे मोठे नुकसान झाले नाही. वाहन आणि घराची जाळपोळ करत संशयिताने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या