शेतकऱ्यांना मोबदला देते वेळी हात आखडता न घेता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नजिकच्या तालुक्याच्या ठिकाणाचे आजचे बाजारभाव ग्राहय धरून त्याचे पाचपट तसेच शहरी भागातील औद्योगिक आणि खनिज जमिनी अकृषक जमिनी, राष्ट्रीय महामार्ग लगतच्या जमिनी यांना सुध्दा बाजारभावाच्या सरसकट पाचपट मोबदला देण्यात यावा तसेच शक्तीपिठ महामार्गाच्या दोन्ही बाजूस कमीत कमी बारा फुट रुंदीचा सर्व्हिस रोड आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची व्यवस्था करण्यात यावी. हा महामार्ग पूर्णत्वास येतांना काही शेतक-यांच्या शेताचे दोन भाग पडून १ ते २० गुंठ्यापर्यंतचा तुकडा दुस-या बाजूस होण्याची शक्यता आहे. शासनाने २० गुंठयापर्यतच्या तुकड्याचे सुध्दा संपादन करावे.तसेच मोबदल्याची रक्कम दिल्यास तसेच ती अल्प असल्यास आम्ही सर्व शेतकरी सामुहीकरित्या नाईलाजास्तव ती स्विकारणार नाही तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने जनआंदोलन करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.