नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टीवासीयांना वाढीव बांधकामाप्रकरणी सिडको व नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिसांच्या विरोधात तसेच या गरजेपोटी घरांवर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने (शरदचंद्र पवार गट) सिडको व महापालिकेच्या मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्च्यामध्ये नागरिकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.