बसमध्ये छेडणाऱ्या व्यक्तीला ‘तिने’ धाडसीपणे शिकवला धडा

बसमध्ये छेडणाऱ्या व्यक्तीला ‘तिने’ धाडसीपणे शिकवला धडा
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीचा फायदा घेत एका तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या समाजकंटकाला ज्या तरुणीने जाहीरपणे चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रत्येकाने पाहावा असा हा धाडसी प्रतिकाराचा क्षण आहे. या घटनेने समाजातील काही विकृत मानसिकतेच्या लोकांना चांगलाच इशारा दिला आहे की, आता तरुणी मूकपणे सहन करणार नाहीत, तर त्यांच्याविरुद्ध ठामपणे उभ्या राहतील.

हा धक्कादायक प्रकार एका चालत्या बसमध्ये घडला. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती तरुणीच्या शेजारी बसलेली आहे. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत असताना, हा व्यक्ती हळूहळू त्या तरुणीला अश्लील पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तो मुद्दाम आपल्या हाताच्या कोपराने तरुणीच्या छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या तरुणीने आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने हा सर्व प्रकार लक्षात घेतला. मैत्रिणीने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड केला आणि योग्य वेळी कारवाई केली.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, ही तरुणी सीटवरून उठली आणि त्या व्यक्तीच्या कानाखाली जोरदार लगावली. यानंतर ती मोठ्या आवाजात त्या व्यक्तीला त्याच्या किळसवाण्या कृत्याबद्दल जाब विचारू लागली. बसमधील इतर प्रवाश्यांनीही या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्या तरुणीला पाठिंबा दिला. सुरुवातीला आपली चूक मान्य करण्यास नकार देणारा तो व्यक्ती शेवटी हात जोडून माफी मागताना दिसला. या संपूर्ण घटनेने उपस्थित प्रवाश्यांनाही धक्का बसला, पण तरुणीच्या धाडसाला सर्वांनीच दाद दिली.

हा व्हिडीओ एका एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या तरुणीच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं, "या तरुणीला सलाम! तिच्या धाडसाने सर्व मुलींना प्रेरणा मिळेल." दुसऱ्या एका युजरने म्हटलं, "जर बसमधील इतर प्रवाश्यांनीही त्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला असता, तर असे समाजकंटक पुन्हा असं कृत्य करायची हिम्मत करणार नाहीत. "सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील अशा अत्याचारांच्या घटना नवीन नाहीत. रस्त्यावरून चालताना छेडछाड, अपशब्दांचा वापर, पाठलाग असे प्रकार अनेकदा समोर येतात. मात्र, अशा घटनांविरुद्ध आता तरुणी अधिक सजग आणि धाडसी बनताना दिसत आहेत.
 

संबंधित बातम्या