शिंदे–अजित पवारांचे पक्ष चोर, त्यांना पक्ष म्हणून मान्यता नाही – संजय राऊत

शिंदे–अजित पवारांचे पक्ष चोर, त्यांना पक्ष म्हणून मान्यता नाही – संजय राऊत
  • MG News
  • ऑक्टोबर 14 2025

Share on  

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटांवर तीव्र टीका केली. "शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना आम्ही पक्ष म्हणून मानत नाही, कारण ते चोर आहेत," अशा शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला.

तब्येतीबाबत प्रतिक्रिया:
तब्येतीबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “तब्येत चांगली आहे. लहानसहान शरीरात बदल होत असतात. शिष्टमंडळाला जाण्याची तयारी सुरू आहे.”

निवडणूक आयोगावर आरोप:
निवडणूक आयोगाविषयी बोलताना राऊत म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभेत आमची 45 लाख मते वाढली, पण त्याचा हिशोब द्यायला आयोग तयार नाही. नाशिकमध्ये साडेतीन लाख मते डुप्लिकेट आहेत, तरी आयोग कारवाई करत नाही. एक मत चोरणार असाल तर निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायचा कसा?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राज ठाकरे आणि काँग्रेस संदर्भात:
राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळातील सहभागावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे या शिष्टमंडळात असावेत की नाही, हे ठरवणार काँग्रेस पक्ष नाही. हा सामूहिक निर्णय आहे. जर भारतीय जनता पक्षाचा नेता शिष्टमंडळात आला असता, तर काँग्रेसने विरोध केला असता का?” असा सवाल राऊत यांनी केला.

मतदार यादीतील भोंगळ कारभार:
नाशिकमधील मतदार यादीबाबत बोलताना राऊत म्हणाले, “नाशिकमध्ये साडेतीन ते चार लाख डुप्लिकेट मते आहेत, आणि हेच लोक आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदान करणार आहेत,” अशी गंभीर तक्रार त्यांनी केली.
 

संबंधित बातम्या