सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नागपंचमीनिमित्त शिराळाकरांनी जिवंत नागांची केली पुजा

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नागपंचमीनिमित्त शिराळाकरांनी जिवंत नागांची केली पुजा
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

सांगलीच्या ३२ शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करताना,केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या एका परवानगीमुळे शिराळाकरांना जिवंत नागाचे दर्शन होणार आहे. त्यामुळे शिराळकरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घालण्यात आल्यानंतर गेल्या २३ वर्षांपासून शिराळकर हे प्रतिकात्मक नागांची पूजा करून न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करत होते. मात्र यंदा केंद्र सरकारने शिराळकरांना नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन होणार आहे. शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन पारंपारिक प्रचार करण्याच्या उद्देशाने २१ शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता शिराळकरांना नागपंचमी साजरी करताना यंदा जिवंत नागांचे दर्शन देखील होणार आहे, त्यामुळे शिराळाकरांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या