नांदगावला शिवसेना ठाकरे गट आक्रमक; ज्वलंत प्रश्नांवर वेधले प्रशासनाचे लक्ष

नांदगावला शिवसेना ठाकरे गट आक्रमक; ज्वलंत प्रश्नांवर वेधले प्रशासनाचे लक्ष
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

नाशिकच्या नांदगावमध्ये गिरणा धरण ५६ खेडी योजना जलवाहिन्यांमधून पाणी गळती, रेल्वे अंडरपासमध्ये वर्षभर साचणाऱ्या पाण्यासह विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अंडरपासचा रस्ता मोकळा, झेलम, शालिमार, सचखंड, सेवाग्राम व बडनेरा एक्सप्रेस हा रेल्वे गाड्यांना नांदगाव व न्यायडोंगरी स्थानकांवर थांबा द्यावा. येवला रोडवर पादचारी पूल उभारावा उबाठा कार्यालयावर झालेल्या बेकायदेशीर कब्ज्याची चौकशी करावी आदी मागणी यावेळी करण्यात आली.

संबंधित बातम्या