जिल्ह्यात शेतकर्‍यांची मागणी असलेल्या खताचा तुटवडा; शेतकरी हवालदिल

जिल्ह्यात शेतकर्‍यांची मागणी असलेल्या खताचा तुटवडा; शेतकरी हवालदिल
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

शहर व तालुक्यातील कृषी सेवा केंद्राकडून गोरगरीब शेतकर्‍यांची मागणी असलेल्या युरीया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ कसा असा संतप्त सवाल शेतकर्‍याकडून विचारला जात आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह जिल्हा मध्ये ९३% पेरणी युक्त क्षेत्रावर शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे. महिना झाला तरी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रामध्ये खतच मिळेना. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. खत मिळत नसल्याने दुकानदारांकडून लुबाडणूक, साठेबाजीची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या युरिया, डिएपी सह इतर खतांचा कृषी सेवा केंद्राकडून अनाधिकृत रित्या साठा करून ठेवला जाऊ शकतो. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतकर्‍यांना खत उपलब्ध नाही असे सांगून माघारी पाठविले जात आहे. अनेक बड्या कृषी सेवा केंद्र लोकांनी ग्रामीण भागातील छोट्या कृषी व्यावसायिक दुकानदारांना मोठ्या प्रमाणात युरिया संपला असे सांगितले जात आहे. शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या इतर खतांची विक्री केलेली असून सदरील दुकानदार हे मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन शेतकर्‍यांना खत विक्री करीत असल्या बाबतच्या अनेक मौखिक तक्रारी शेतकरी करीत आहेत.
कृषी सेवा केंद्र किंवा खत विक्रेत्यांनी खताचा साठा करू नये, असे जर आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. 

संबंधित बातम्या