मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड आर्ट युनिव्हर्सिटी दिल्ली यांच्या कडून सामाजिक कार्यातील सेवेची मानद डॉक्टरेट या पदवीने श्री शाम हांडोरे यांना सन्मानित करण्यात आले. हा सन्मान हरियाणा येथे संपन्न झाला. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा प्रसार शिबिरांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे आणि करत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. खासदार भास्कर भगरे, आमदार सीमाताई हिरे, सरोजताई अहिरे, नेते निवृत्ती अरिंगळे, दत्ताजी गायकवाड, अजयदादा बोरस्ते, दिनेश निकाळे, खंडेराव मेढे, भाऊसाहेब दळवी, अर्जुन पगारे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.