श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी

 श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे गुरुवार ३१ जुलैला रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या ठाणे जिल्हाधिकारी या पदासाठी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुरुवारी पांचाळ यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. 
      श्रीकृष्णनाथ पांचाळ हे जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, गुरुवारी ३१ जुलैला श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना ठाणे जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याबाबतचे परिपत्रक मंत्रालयातून जारी करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ठाण्याचे निवृत्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. 

संबंधित बातम्या