शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा चौकात करण्यात आली मूक निदर्शने

 शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा चौकात करण्यात आली मूक निदर्शने
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे कोल्हापुरातील दसरा चौकात एका वेगळ्याच पद्धतीने मूक निदर्शने करण्यात आली आहेत. राज्यातील महायुतीच्या तीन मंत्र्यांसह दोन आमदारां विरोधात हे आंदोलन करण्यात आले. ऐतिहासिक दसरा चौकात पत्त्यांचा डाव रचून आणि लोकप्रतिनिधींचे मुखवटे घालून हे आंदोलन करण्यात आले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना ‘रमी मास्टर’ अशी उपाधी देत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ‘पैशांची बॅग’ दाखवत संजय शिरसाठ आणि इतर लोकप्रतिनिधींचे फलकही लावण्यात आले आहेत. "जब मिल बैठेंगे पाच यार" अशा मोठ्या अक्षरातील मजकुरासह हे सगळे आंदोलन दसरा चौकात करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या