सोलापूर : सोनं चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; फौजदार चावडी पोलिसांची कारवाई

सोलापूर : सोनं चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; फौजदार चावडी पोलिसांची कारवाई
  • MG News
  • मे 19 2025

Share on  

सोलापूर : सोनं चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; फौजदार चावडी पोलिसांची कारवाई

सोलापूर | रस्त्यावरून जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनं चोरणाऱ्या एका टोळीला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पाच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून, सुमारे 5 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही टोळी बीड जिल्ह्यातील असून, सोलापूरमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल होते. टोळीची कार्यपद्धती ही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने रस्त्यावरून जाताना हिसकावून पळ काढण्याची होती.

फौजदार चावडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे या टोळीचा पर्दाफाश झाला असून, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.

संबंधित बातम्या