सोलापूर : महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारखान्याच्या नुकसानीची भरपाई द्या – नरसय्या आडम

सोलापूर : महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारखान्याच्या नुकसानीची भरपाई द्या – नरसय्या आडम
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

   सोलापूर : महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारखान्याच्या नुकसानीची भरपाई द्या – नरसय्या आडम

  सेंट्रल टेक्स्टटाईल्स हा एमआयडीसी परिसरातील फार मोठा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये जवळपास 200 कामगार काम करतात. ही आग कशामुळे लागली याचा अद्यापही पत्ता नाहीये
  सर्वात महत्वाची बाब म्हणजे सेंट्रल टेक्स्टटाईल्स कंपनीच्या मालकाचे नातेवाईक या आगी दरम्यान एका खोलीत अडकल्याची माहिती नरसय्या आडम यांनी दिलीय
  त्यांना काढण्याचे प्रयत्नही होत नाहीयेत असा ही आरोप माजी आमदार यांनी केला आहे
  महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी यासंदर्भात पाऊल उचलण्यासाठी सांगितलं असून, त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं गरजेचं आहे. याठिकाणी आग लागून जवळपास 6 ते 7 तासापासून आग       लागली आहे.  महापलिका आणि पोलीस प्रशासन यंत्रणा निष्फळ झालेली आहे
  यामध्ये नातेवाईकांनी केलेले आरोप हे खरे आहेत. अग्नीशमन दलाची गाडी लवकर आली नाही. त्याचवेळेस गाड्या आल्या असत्या तर अनर्थ टळला असता
  या संबंधी मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार असून, या सर्व प्रकाराची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी करणार आहे
  यासंबंधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि कारखान्याचे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्याची मागणी करणार आहे
 

संबंधित बातम्या