सोलापूर : बार्शीत पावसामुळे छत कोसळलं; एक जण जखमी, पाचजणांची सुखरूप सुटका
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात संततधार पावसामुळे तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनच्या पत्र्याचं छत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आलं.
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.