सोलापूर-दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहिर ढासळल्याने दोघे ढिगार्याखाली अडकले .
बोरमणी गावातील जवळपास 5 ते 6 मुलं एका शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेले होते . त्यावेळी अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही सर्व मुलं या विहिरीत अडकली होती
ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेत तिघांना विहिरीतून बाहेर काढलंय
मात्र दोन मुले अद्याप ही विहिरीतच अडकली आहेत, दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत . आज बोरामणी गावात साधारण 12 :30 च्या सुमारास दत्ता शेळके यांच्या विहिरीत 5 मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यातील 3 मुलं ही सुखरूप आहेत तर 2 मुले मातीत अडकली आहेत.
सदर ठिकाणी पोलीस प्रशासन, दक्षिण तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मुले बाहेर काढण्याचे काम सुरूय
विहिरीमध्ये पाणी पातळी जास्त असल्याने वेळ लागत आहे.
मुलांना रेस्क्यू करण्यासाठी 5 आणि 10 HP च्या मोटारीच्या साहाय्याने पाणी उपसा सुरूय त्यासोबतच जेसीबीच्या साहाय्याने माती काढण्याचे कार्य सुरूय
मनोज अभंग (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
रवी मटके, (प्रत्यक्षदर्शी)