महाराष्ट्र राज्य शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी असलेली ॲग्रीस्टक (फार्मर आयडी कार्ड) बनवण्याची 29 एप्रिल 2025 पासून सुरूवात करण्यात आली. शेतकऱ्यांना एकाच नंबर वर शेतीसंबंधी सर्व माहिती शासकीय लाभ, माहिती, अनुदान, हवामान अंदाज या सर्वांची माहिती एका छताखाली आणण्यासाठी राज्य शासनाने हा प्रकल्प गेल्या 6 महिन्यापासून राबविला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील अद्यापही 15 तालुक्यातील अजूनही बरेच शेतकरी बांधवांनी आपले किसान कार्ड बनवले नाही. त्याचबरोबर गेल्या ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अनुदान देण्यासाठी मोठी अडचण देखील निर्माण झालेली असून अद्यापही जिल्ह्यातील एकूण शेतकरी संख्या 7 लाख 84 हजार 736 पैकी 6 लाख 9 हजार 638 इतक्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड बनवले असून अद्यापही 1 लाख 75 हजार 98 नाशिक जिल्ह्याची टक्केवारी 77.69% इतकी असून अजूनही शेतकरी बांधवांची किसान कार्ड करणे बाकी असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 15 तालुक्यात मंडळ निहाय दिनांक : २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर ह्या दरम्यान कॅम्प रोड आयोजित करीत राहिलेल्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी तसेच इ - केवायसी पुर्ण करण्यासाठी सुचित केलेले आहेत.
या योजनेची अंमलबजावणी 100% टक्के होण्यासाठी काम पूर्ण करण्यासाठी आपले सरकार केंद्र यांना मंडळ निहाय आवश्यक्य त्या सामग्री सह उपस्थित राहण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेले आहे. सरकारच्या अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या किसान कार्ड बनवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी गती पकडलेली दिसून येत आहेत. महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना राहिलेल्या शेतकऱ्यांची यादी बनवून त्यांना तात्काळ किसान कार्ड बनवण्यासाठी च्या सूचना देण्यात आलेल्या असून ऑक्टोबर महिन्यातील अनुदानापासून कोणताही शेतकरी वंचित न राहण्यासाठी महसूल प्रशासन रात्रंदिवस काम करीत असून राहिलेल्या शेतकऱ्यांना महसूल विभागातर्फे किसान कार्ड बनवण्यासाठी आव्हान करत असून सरकारच्या आलेल्या अनुदानाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत. त्याचबरोबर सामूहिक गट अथवा इतर विवादात्मक परिस्थितीत किसान कार्ड काढण्यासाठी अडचणी असेल तर ग्रामपंचायत स्तरावर देखील समुपदेश/ लोक अदालीचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.
बागलाण तालुक्यात फार्मर आयडी बनविण्यासाठी उपविभागीय अधिकारी महेश शेलार आणि तहसीलदार कैलास चावडे यांनी संबधित महसुल यंत्रणा आणि कृषी विभाग यांना सोबत घेत या कॅम्प यशस्वी करण्यासाठी सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा आढावा घेत गेल्या २ दिवसात फार्मर आयडी बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असून त्याचबरोबर बागलाण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत आणि संबधित कोतवाल व पोलिस पाटील यांना देखील सदर या कॅम्पचे आयोजानात सहभागी करून फार्मर आयडी राहिलेल्या शेतकरी बाधावाची १००% काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीसण असतांना देखील तहसिल कार्यालय बागलाण अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यासाठी कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. त्यावेळी तहसिलदार यांनी स्वता कार्यालयात लक्ष देऊन काम केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळाले. या बाबतीत तहसीलदार कैलास चावडे आणि सहायक महसूल अधिकारी गणेश मारग यांची दिवाळी सणात देखील केलेल्या कामामुळे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळीच अनुदान मिळाल्याची चर्चा बागलाण मध्ये होत असून त्याचबरोबर फार्मर आयडी किती महत्त्वाचे असल्याचे चित्रीकरणाचा ग्राम महसूल अधिकारी दीपक मोठे यांच्या व्हिडिओ ची देखील कौतुक करीत असून आपल्या तालुक्याला खरच देव मालेदार चा आशीर्वाद असल्याची चर्चा यशवंत नगरी तील शेतकरी करीत आहेत.
तालुका निहाय आकडेवारी-
एकूण शेतकरी संख्या फार्मर आयडी बनविल्या शेतकरी संख्या टक्केवारी%
१) त्रबेकेश्वर २६७५३ १६४२४ ६१.३९
२) नाशिक ४३३११ २७८७३ ६४.३६
३) सिन्नर ८३३०६ ६०३०६ ७२.३९
४) इगतपुरी ३९१८३ २८७२७ ७३.३१
५) बागलाण ७५६१६ ५५९५६ ७४.००
६) दिंडोरी ५८२५७ ४३८४२ ७५.२६
७) कळवण ३३२९७ २५२५५ ७५.८५.
८) निफाड ८४४२४ ६७९८९ ८०.५३
९) चांदवड ५८१२८ ४७२८२ ८१.३४
१०) मालेगाव ९९२९७ ८०९५१ ८१.५२
११) देवळा ३३६६९ २७७६१ ८२.४५
१२) नांदगाव ४८५३४ ४०५३१ ८३.५१
१३) पेठ १५४७५ १३०७९ ८४.५२
१४) येवला ६१८३९ ५२७६९ ८५.३३
१५) सुरगाणा २३६४७ २०८९३ ८८.३५
एकूण ७८४७३६ ६०९६३८ ७७.६९
प्रतिक्रिया:
देवमालेदार (यशवंतनगरी) म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील एकूण शेतकऱ्यान पैकी बागलाण मधील आता फक्त १९६६० इतक्याच शेतकरी बाधावची फार्मर आयडी तयार करण्याचे बाकी असून राहिलेले असून यासर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आव्हानाला चागला प्रतिसाद देत २ दिवसात ४०० हुन अधिक शेतकऱ्यांनी या कॅम्प मध्ये मध्ये सहभाग नोंदवून आपले फार्मर आयडी बनवून घेतले आहेत. तसेच उर्वरित शेतकऱ्यांनी देखील या कॅम्प मध्येआपले फार्मर आयडी बनवुन घ्यावे. त्याचबरोबर फार्मर आयडी तयार होताच ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान देखील वितरीत करीत आहोत.
- महेश शेलार
उपविभागीय अधिकारी बागलाण
प्रतिक्रिया:
सटाणा तालुक्यातील सर्व शेतकरी बाधावानी या कॅम्प मध्ये आपले फार्मर आयडी बनवुन घ्यावे. तसेच फार्मर आयडी काढतांना बऱ्याच शेतकरी यांच्या आधारकार्ड व ७/१२ या नांवात फरक असल्यासत्या शेतकरी चा नेम मॅच स्कोर ० ते २० असा दाखवतो त्या नंतर अशा शेतकऱ्यांनी याबाबत मनात आपले फार्मर आयडी तयार होईल का नाही. अशी कोणतीही शखा मनात ठेवू नये कारण त्यानंतर संबधित ग्राम महसूल अधिकारी त्यांची ७/१२ वरून तपासणी करून अप्रुव्हल देतात त्यानंतर माझ्या लॉगिनला त्या मान्यतेसाठी येतात मी मान्यता दिल्यावर त्या शेतकऱ्याची फार्मर आयडी तयार झालेले असते तरी राहिलेल्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेऊन शासनाच्या नानाविविध योजनाचा लाभ घेण्यासाठी देखील या फार्मर आयडी आवश्यक असते. आतापर्यंत बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम देखील झालेले आहेत.
-कैलास चावडे
तहसिलदार बागलाण